आमची तक्रार हीच आहे की, आमचे मुख्यमंत्री खंबीरपणे या प्रश्नाची सोडवणूक व्हावी म्हणून उभे राहत नाहीत
अध्यक्ष महाराज, मला खरचटले असे वर सांगण्यात आले, ठीक आहे. त्यांच्या दृष्टीने ते खरचटणे असेल, कारण स्वातंत्र्य चळवळीचा त्यांना सुदैवाने अनुभव नाही. लाठीमाराच्या वेदना कशा असतात, याचा अनुभव नाही आणि या पुढे कधी घ्यावा लागण्याची शक्यता नाही, परंतु म्हणून दुसऱ्याला लागलेल्याची ‘खरचटणे’ म्हणून संभावना करणे हे योग्य नाही, असे मला वाटते. हिणकस प्रवृत्तीचे हे द्योतक आहे. अनेक लोकांचे खुबे निखळलेले मला माहीत आहेत.......